सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
उन्हाच्या तडाक्यापासून झाडाला सावलीला लावलेली दुचाकी विद्युत तारांच्या झाडाच्या फांदीला घर्षण होऊन ठिणग्या पडल्या यामध्ये झाडाखाली लावलेल्या पाच दुचाकीपैकी एका दुचाकीचा जळून कोळसा झाला.
प्रसंगावधान राखून विद्युत प्रवाह बंद करून आग विझवल्याने इतर चार मोटारसायकल आगीपासून वाचल्या.
दि. २२ रोजी दुपारच्या वेळेला ही घटना घडली. कोऱ्हाळे ता. बारामती येथील सागर येळे हा युवक पोलीस भरतीचा अभ्यास करण्यासाठी करंजेपुल येथील विवेकानंद अभ्यासिकेत येतो. तो व त्याचे काही मित्र अभ्यासिकेजवळील लिंबाच्या झाडाचा सावलीला मोटारसायकल लावतात. दुपारच्या वेळी झाडाच्या फांद्या व विदुयत तारा यांच्यात घर्षण होऊन ठिणग्या पडल्या यामध्ये सागर येथे याच्या कावासकी या गाडीने पेट घेतला.
अभ्यासिकेतील शिक्षक गणेश सावंत यांनी तातडीने महावितरण ला फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. त्यानंतर मुलांनी ही आग विझवली. व इतर गाड्या आगीपासून वाचवल्या. त्यानंतर सोमेश्वर कारखान्याचा अग्निशामक बंब बोलावून आग विझवण्यात आली.