सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
वाणेवाडी ( ता. बारामती) येथील न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व भाग शाळा मुरूम या विद्यालयात २५ वर्षापूर्वी दहावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मेळावा नुकताच संपन्न झाला.
१९९८-९९ या कालावधीत दहावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनीचा शिक्षकांविषयी "कृतज्ञता" व्यक्त करण्यासाठी तब्बल २५ वर्षांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास ७० विद्यार्थ्यांनी,१६ शिक्षकांनी व एक शिक्षकेत्तर सेवक यांनी उपस्थिती होते. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचे फेटा बांधून सन्मानचिन्ह देऊन व शिक्षकांची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सन्मानचिन्ह देऊन फेटा बांधून,शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देउन गौरविण्यात आले.
यावेळी इंग्रजी विषयाचे व सर्व शाळेला शिस्तप्रिय म्हणून परिचित असणारे शिक्षक काशिनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपल्या कणखर आवाजाने मुलांना समाजात शिस्तीचे महत्व याबद्दल संबोधीत केले. तसेच प्रेमाने बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर शिक्षक भाऊसाहेब गुलदगड, शिक्षिका रत्नमाला हिरेमठ, शिक्षक राजेंद्र गायकवाड, शिक्षक शहाबुद्दीन मणेर, शिक्षक दत्तात्रेय माने यांनी मुलांना मार्गदर्शन करुन एवढ्या वर्षांनी मुलांनी कृतज्ञता व्यक्त केलेबद्दल आभार व्यक्त केले. त्याचबरोबर शिक्षक आनंदराव माहुरकर, शिकीलकर अख्तर. रंजना भापकर, निता मोरे-इंगळे, .सिताराम यादव, सुदाम गरुड, .पांडुरंग तावरे, संपत सुतार,.शिवकुमार भोईटे, .अजित भोसले या शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तसेच शिक्षकेतर कर्मचारी सेवक श्री बाळकृष्ण कोंडे यांनादेखील गौरविण्यात आले. कार्यक्रमाकरिता लक्ष्मण टाळके हा विदयार्थी भुम परांडा येथुन २५० किमी प्रवास करुन दुचाकीवर आला होता. त्याचे सर्व शिक्षकांनी कौतुक केले. शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कालिदास गरूड यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचा सर्व शिक्षकांनी प्रातिनिधिक सत्कार केला. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमोल भोसले यांनी तर शरद शिरवळे, निखिल भोसले, विकास भोसले, पंकज गाडे, सिद्धनाथ यादव, सोनल भोसले - पवार, केतन शिंगटे, किरण जगताप, अमर बाबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.