Bhor News l संतोष म्हस्के l मान्सूनची चाहूल..भोरला भात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
मान्सून आठ ते दहा दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपल्याने भोर तालुक्यात शेतकऱ्यांची खरिपातील भात बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यामुळे बी-बियाणे दुकानांमध्ये गर्दी होत आहे.
           खरीप हंगाम काही दिवसांवर आला आहे. खरिपातील पिकांसाठी शेतकरी शेती मशागत लगबगीने करीत आहेत.राज्यात भात पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या भोर तालुक्यात महत्त्वाचे ज्यादा पाण्यावरील गर्वे इंद्रायणी,सोनम,वाडाकोलम,दप्तरी खुशबू तर कमी पाण्यावर येणारे हाळवे सुंदर गंगा, कावेरी,ओम थ्री ,मेनका आदींसह ३० प्रकारचे भात बियाणे बाजारपेठेतील बी-बियाणे दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.मान्सूनची सुरुवात लवकरच होणार असल्याच्या आशेने ग्रामीण भागातील विसगाव,चाळीसगाव,बत्तीसगाव वेळवंड हिरडोस मावळ खोऱ्यातील तसेच पूर्वेकडील पट्ट्यातील शेतकरी लगबगिने भात बियाणे खरेदी भोर शहरातील बी-बियाणे दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत बियाण्यांच्या किमती प्रतिकिलो १० रुपये प्रमाणे वाढले असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.बियाण्यांच्या पिशव्या दहा ,वीस,पंचवीस तसेच तीस येत असल्याने पिशवी मागे शंभर ते दोनशे रुपये वाढले आहेत. खरिपातील शेती कामाच्या लगबगीत भात बियाणे खरेदी करण्यास वेळ होऊ नये म्हणून मान्सूनचा पाऊस सुरू होण्याअगोदर तसेच हवे त्या जातीचे बियाणे मिळावे यासाठी लगबगिने भात बियाणे खरेदी करीत आहोत असे धावडी येथील शेतकरी लक्ष्मण दरेकर यांनी सांगितले.
To Top