Bhor News l बारामतीचा 'खासदार' कोण ? भोर तालुक्यातील पारा-पारांवरील..चौक-चौकातील गप्पांवर लावल्या जातात पैंजा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यामध्ये लोकसभेसाठी उत्साहाने मतदान पार पडले. नागरिकांनी सकाळी व सायंकाळी मतदान केंद्रांवर गर्दी करून मतदानाचा हक्क बजावला.आता मतदान झाले मात्र भोरकरांना उत्सुकता ४ जूनच्या निकालाची लागली आहे.
        लोकसभेसाठी नोटासह ३८ उमेदवार रिंगणात असले तरी महत्त्वाच्या महाविकास आघाडी व महायुतीच्या दोनच उमेदवारांमध्ये चांगलीच चुरशीची निवडणूक प्रक्रिया झाली.दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांसाठी निवडणूक प्रतिष्ठित झाल्याने दोन्ही गडगाव गावी आपणच पुढे असल्याचे सांगत आहेत. अनेकांनी तर तालुक्यात पहिला लावल्याचे चर्चा सुरू आहे.उन्हामुळे अनेक मतदार घराबाहेर पडले नसल्याने त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला.मंगळवार दि.७ सायंकाळी मतदान प्रक्रियेचा कालावधी संपल्यापासून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून आमचा उमेदवार इतक्या मताधिक्याने निवडून येईल तर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून आम्हीच बाजी मारणार असल्याचा दावा केला जात असल्याने तालुक्यात चौका-चौकात तसेच पारावरच्या गप्पांना रंगत वाढली आहे.तसेच शहरातील हॉटेल्स,पान टपरी,बस स्थानक येथेही भोर शहरासह ग्रामीण भागात जोरात मतदान झाले,अहो काही गावात तर मतदारांना पैसेच वाटले, जाऊद्या कोणी का निवडून येईना आपल्याला काय त्याचा फरक पडणार आहे अशा चर्चांना उधान आले आहे.
To Top