सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
हरिद्वार-उत्तराखंड येथील एमबीबीएस आयुर्वेदिक कॉलेजला प्रवेश देतो म्हणून बारामती शहरातील एका पालकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. याबाबत राजेश सदाशिव शिंदे रा. पाटस रॉड बारामती यांनी पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून बारामती पोलिसांनी संजय शंकरलाल शहा रा. नांदेड सिटी पुणे व प्रीतम शंकरराव तिपायले रा. हडपसर पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी, बारामती येथील राजेश शिंदे यांची मुलगी ऋतुजा हिला हरिद्वार उत्तराखंड येथील एमबीबीएस आयुर्वेदिक कॉलेजला प्रवेश देतो असे सांगून
१६ लाख रूपये वेळोवेळी बारामती सहकारी बँक शाखा बारामती येथून आर.टी.जी.एस. व्दारे व गुगल पे व्दारे संजय शंकरलाल शहा रा. नांदेड सिटी सिहंगड रोड पुणे व प्रितम शंकरराव तिपायले रा. ग्रेव्हीला मगरपटटा सिटी डेस्टीनेशन सेन्टर हडपसर पुणे यांनी घेवून त्यापैकी फक्त १ लाख रूपये भरून उर्वरित रक्कम फि म्हणून न भरता स्वताचे फायदा करीता तिचा वापर करून सदर रक्कमेचा अपहार केला. मुलीची राहीलेली फि न भरून १५ लाखाची फसवणूक केली आहे.