सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : गणेश पवार
सरडे ता. फलटण येथे दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत.
दि ११ रोजी सरडे ता फलटण गावाच्या हद्दीत दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांवर वीज कोसळल्याने तिघेजण जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज कोसळल्याने ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ रा वंजारवाडी खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर या अल्पवयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर प्रथमेश सुनील भिसे वय १७ रा. वायसेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर व विक्रम विजय धायगुडे वय १६ रा सरडे ता. फलटण हे जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील तीनही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी दिली.