बारामतीच्या पश्चिम भागात चोरट्यांचा भरदिवसा बंद घरांवर डल्ला : चार गावातील पाच घरे फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चोपडज, सस्तेवाडी, शेंडकरवाडी व मुरूम गावात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराची कुलूप तोडून सस्तेवाडी येथून १ लाख ३० हजार व मुरूम येथून १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. 
           दि. १४ रोजी दुपारी १२ ते ५ च्या दरम्यान या चार गावातील पाच घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. यातील मुरूम व सस्तेवाडी येथून रोख राकमेसह सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत. तर शेंडकरवाडी, चोपडज व मुरूम मधील तळवणीनगर येथील घरांची कुलूपे चोरट्यांनी तोडली. मात्र याठिकाणी चोरट्यांचा हाती काही लागले नाही. वडगाव निंबाळकर पोलीस पुढील तपास करत आहेत.
To Top