सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाल्हे : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे एका बार मध्ये दारू पित असताना दोघा मित्रांमध्ये झालेल्या वातातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे.यामध्ये पवन शेलार या २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.
या संदर्भात स्थानिक लोकांनी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पिंगोरी येथील तुषार यादव, पवन शेलार व आडाचीवाडी येथील अविनाश पवार हे चौघे मित्र वाल्हे येथील एका बार मध्ये दारुपित बसले होते. यादरम्यान तुषार यादव आणि पवन शेलार यांच्यात उसने पैशावरून वाद झाला. बारच्या बाहेर आल्यावर तुषार यादव यांने मयत पवन शेलार यांच्या डोक्यात दारूची बाटली मारली. यानंतर त्याच्या डोक्यात विटा मारून त्याला गंभीर जखमी केले. स्थानिक लोक व बरचालक यांनी तुषार याला जेजुरी येथे उपचारासाठी पाठवले.यानंतर त्याला शेलार पुण्यातील ससून सुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी दुपारी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.यासंदर्भात मयत शेलार यांच्या बहिणीने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर घटने नंतर अतिरिक्त पोलिस अधिक्षक दर्शन दुगड, पोलिस उपअधिक्षक स्वप्निल जाधव, जेजुरीचे पोलिस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी घटना स्थळाला भेट दिली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन पुजारी, एन.एल.तारडे, हवालदार विठ्ठल कदम, केशव जगताप, प्रशांत पवार उपस्थित होते.जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे आणि त्यांच्या टीमने यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी तुषार यादव याचा शोध पोलीस घेत आहेत. तर याबाबतचा अधिकचा तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुदर्शन दुगड करीत आहेत...
------------------
मुख्य आरोपी झाला पोलिसांसमोर हजर
मारहाणीनंतर फरार झालेला मुख्य आरोपी बुधवारी रात्री 11 वाजता जेजुरी पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाला आहे. दोघांच्या भांडणात आरोपी देखील जखमी झाला आहे.मयत शेलार यांनी आरोपीवर स्क्रू ड्रायव्हर चा साहाय्याने हल्ला केला .त्यावेळी त्याला प्रतिकार करतांना तो गंभीर जखमी झाल्याचे आरोपी तुषार यादव याने म्हटले आहे.याबाबत जेजुरी पोलीस अधिकचा तपास करीत आहेत.