Bhor News l शेतकऱ्यांवर गोळीबार करणारा रिसॉर्ट मालक हितेश सिंग भोर पोलिसांच्या ताब्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील भाटघर जलाशयाच्या बॅक वॉटरला असणाऱ्या पसुरे ता.भोर येथे रिसॉर्ट मालक व शेतकऱ्यांमध्ये जमिन हद्दीच्या वादातून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. दरम्यान रिसॉर्ट मालकाने शेतकऱ्यांवर बंदूक रोखून दोन गोळ्या झाडल्याची घटना बुधवार दि.१५ घडली.रिसॉर्ट मालक हितेश पाल सिंग सध्या रा. पसुरे कुंजवन रसॉर्ट ता.भोर याच्यावर भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून तात्काळ आरोपीस अटक करण्यात आली.याची फिर्याद शेतकरी अशोक गेनबा बिऱ्हामने रा.पसूरे यांनी फिर्याद दिली.
          भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने एचटी पोल लाईनचे रोवलेल्या खांबापासून पुढे शेतकऱ्याच्या शेत जमिनीत गट नं.१८८ उंदीरमाळ येथे अंदाजे २० ते २५ फूट अंतरावर ठिकठिकाणी नव्याने सिमेंटचे पोल रोवले आहेत.फिर्यादी शेतकरी पोल रोवलेची पाहणी करन्याकरता गेले असता त्यावेळी तेथे काम करणारे कामगार शेतकऱ्यांना पाहून पळून गेले.काही वेळाने तेथे आरोपी हितेश पाल सिंग हा त्याचे हातात दोन बंदूक घेऊन आला. तेव्हा फिर्यादीने त्याला आमचे जागेत अतिक्रमण करून पोल घालू नको.तुझ्या जागेत तू पोल घालून तुला काय करायचे आहे ते कर असे सांगितले. त्याचा आरोपीला राग आला व शटअप तुम यहा से चले जाओ,पीछे हटो ,जाओ नही तो मै तुमको गोली मार दूंगा ,तुम मरेगा असे धमकावत बोलून त्याने त्याचे हातातील एक बंदूक माझे व बाळासाहेब विठ्ठल सणस असे आमचे दिशेने रोखून त्यातून एक फायर केला.त्यानंतर आरोपीने परत दुसरी बंदूक उचलून त्यातून दुसरा फायर करून आम्हाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.फिर्यादी शेतकरी बाजूला झालेणे तो फायर त्यांना लागला नाही.पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.
                                               
To Top