Baramati News l बारामती-पुरंदरकरांनो सावधान....! पोलीस असल्याची बतावणी करत..इथं गांजची तस्करी सुरू आहे..तुमच्याकडील नोटा खोट्या असल्याचे म्हणत..वृद्धाला साडेचार हजारांचा गंडा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नवी कोरी काळी गाडी असलेला तब्येतीने सशक्त असलेला व्यक्ती आज सकाळी करंजेपुल येथे बाजार तळा समोर उभा राहिला. एका वयस्कर व्यक्तीला हाक मारून त्याने बोलावून घेतले खिसे दाखवा असे म्हणाला. खिशातून एक कार्ड काढले मी पोलीस आहे असे सांगितले. डोक्यावरती हेल्मेट आहे. तितक्यात अमरजा आळंदीकर घराबाहेर आल्या त्यानी कशाची चेकिंग आहे असे विचारले. इथं गांजाची तस्करी चालू आहे. दोन म्हातारे गांजा घेऊन फिरत आहेत त्यांना शोधत आहोत.  वयस्कर व्यक्तीचे पाकीट काढायला लावलेले . दवाखान्यासाठी त्याने पंधरा हजार रुपये आणले होते. या नोटा नकली आहेत असे तो म्हणू लागला. सौ अमरजा आळंदीकर यांनी तुमचे कार्ड दाखवा असे विचारले त्यांना तुम्ही या नोटा नकली आहेत हे चेक करा असे हे म्हनाला व साडेचार हजार रुपये त्यातील लंपास केले. सदर व्यक्ती ने जॅकेट घातले असून.. खाकी जुनी पेंट आहे. गाडी क्रमांक एम एच १५ एफ २२९३ आहे. आळंदीकर यांनी नोट खरी आहे हे सांगताच तो पळून गेला. सदर वयस्कर व्यक्तीने नंतर रक्कम चेक केले असता साडेचार हजार रुपये त्यातून त्याने नेल्याचे समजले.
     सदर व्यक्तीचे सर्व खिसे नोटांनी भरलेले आहेत.
    परिसरातील सर्वांनी सावध रहावे. अशी घटना आढळलेस त्वरीत पोलिसांना संपर्क करा असे आवाहन करंजेपुल पोलीस हवालदार दीपक वारुळे यानी केले आहे.
To Top