जागतिक रक्तदाब दिवस l रक्तदाब आजाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज : डॉ विद्यानंद भिलारे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
17 मे आज जागतिक रक्तदाब दिवासानिमित्त आपण रक्तदाबविषयी माहिती घेऊयात , खरे तर रक्तदाबविषयी जास्त जनजागृती केली जात नाही तसेच त्याकडे इतक्या गंभीरतेने पहिले जात नाही पण रक्तदाब जास्त असणे किंवा कमी असणे यातून घातक व जीवघेणे उपद्रव होऊ शकतात. 
          आपण पाहिले रक्तदाब म्हणजे काय ते समजून घेऊ रक्तदाब म्हणजे हृदयाने टाकलेले रक्तवाहिन्यावरील दबाव हा दोन पद्धतीने मोजला जातो सिस्टॉलीक व डायस्टलीक , सिस्टॉलीक रक्तदाब म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे गेले तर वरचा रक्तदाब(हृदयाने रक्तवाहिणीवर टाकलेला जास्तीत जास्त दबाव) व डायस्टोलीक रक्तदाब म्हणजे खालचा रक्तदाब (हृदयाने रक्तवाहिणीवरुण दबाव काढून घेतल्यानंतर राहणारा न्यूनतम दबाव ) आता आपण याची योग्य पातळी किंवा नॉर्मल रेंज समजून घेऊ, वरचा रक्तदाब (सिस्टॉलीक) हा 90 mm of Hg ते 120 mm of Hg या मध्ये असेल तर  व खालील रक्तदाब 60 mm of Hg ते 80 mm of Hg च्या दरम्यान असेल तर नॉर्मल समाजाला जातो
*१) उच्च रक्तदाब* (Hypertension / High BP):-
120 mm of Hg च्या पुढे असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 80 mm of Hg पेक्षा पुढे असणारा डायस्टोलीक रक्तदाबस उच्च रक्तदाब असे म्हणाले जाते 
(120 mm of Hg ते 135 mm of Hg साठी प्राथमिक किंवा स्टेज 1 रक्तदाब असे संबोधले जाते तसेच 136 mm of Hg ते पुढे 180 mm of Hg पर्यंत स्टेज 2 रक्तदाब आणि 180 mm of Hg च्या पुढे अति आत्यायिक रक्तदाब समजाला जातो )
2) अल्प रक्तदाब* (Hypotension / Low BP):-
90 mm of Hg च्या पेक्षा कमी असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 60 mm of Hg पेक्षा कमी असणारा डायस्टोलीक रक्तदाबस अल्प रक्तदाब असे म्हणाले जाते 

3) रक्तदाब वाढण्याची चिन्हे
खालीलपैकी कोणती लक्षणे आढळल्यास आपण आपला रक्तदाब म्हणजेच बीपी तरी तपासून घेणे गरजेचे आहे 
-जिना चढताना दम लागणे -चालताना दम लागणे पायावरती व चेहऱ्यावरती सूज येणे 
-हृदयाचे ठोके अचानक वाढणे 
-नेहमी अस्वस्थ वाटणे 
-छातीमध्ये गच्चपणा वाटणे 
-डोके जड राहणे 
-लघवीला वारंवार येणे तसेच रात्री अपरात्री लघवीला उठायला लागणे
इत्यादी

४) रक्तदाबाची कारणे -आहारातील मिठाचे जास्त प्रमाण 
-व्यसन 
-पुरेशी झोप नसणे 
-तणाव 
-किडचे आजार 
-हृदयाचे आजार 
इत्यादी 

५) उपाययोजना आहार विहार मध्ये, 
-आहारातील मिठाचे प्रमाण कमी ठेवणे 
-पुरेशी किमान सात ते आठ तास झोप घेणे 
-पालेभाज्यांचा वापर वाढवणे 
-केळी ,पालक ,दुधी भोपळा याचा आहारामध्ये समावेश करणे
-मांसाहाराचे प्रमाण कमी ठेवणे खाणे झालेच तर कमीत कमी प्रमाणात मांसाहार उकडलेली अंडी आणि मासे याचा कमी प्रमाणात वापर चालू शकतो
-व्यसनापासून दूर राहणे. -सूर्यनमस्कार 
-व्यायाम योगासन इत्यादीचा आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस सराव ठेवणे. 
-मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा करणे. 
६) उपद्रव
बहुतांशी वेळी रुग्ण अचानक इमर्जन्सी डिपार्टमेंट मध्ये बीपी वाढल्याने त्याचे उपद्रवात्मक रूप जसे की मेंदूला स्ट्रोक बसणे, हृदयाचा झटका येणे, पॅलेसिस घेणे, धाप लागणे अशाप्रकारे येतात तरी आपण याच्या पासून स्वतःला वाचवू शकतो. 

सूचना :- वयाच्या 30 नंतर नियमित किमान वर्षातून 2 वेळा आवर्जून आपण रक्तदाब तपासून घ्यावा किंवा जेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाता तेव्हा आपल्या रक्तदाबविषयी माहिती घेऊन चर्चा करावी आणि वाढलेला असल्यास त्वरित तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या गरजेनुसार तपासण्या करून उपचार सुरू करावेत. 

डॉ. विद्यानंद भिलारे
MD medicine CDM-UK 
कन्सल्टिंग फिशियन आणि 
आय सी यू तज्ञ 
साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आयसीयू 
To Top