सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
गुळूंचे ता. पुरंदर येथील अमोल किसन निगडे वय 43 या युवकाचा आपल्या राहत्या घरी बाथरूम मधील इलेक्ट्रिक वायरचाचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
आपल्या शेतातून कामे उरकून घरी परतलेल्या अमोल सायंकाळी पाचच्या सुमारास आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला असता बल्पच्या निसटलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून तो जागीच कोसळला.
घरच्यांनी तातडीने दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पाठीमागे आई-वडील भाऊ दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. गुळूंचे परिसरात त्यांना मोठा मित्रपरिवार असून क्रिकेटच्या (विकेटकीपर फलंदाज) खेळीमुळे त्यांचे परिसरात नाव होते.