सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
संतोष म्हस्के
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वरंध घाटातील महाड (जि.रायगड) हद्दीत रस्ता ३० मे पर्यंत बंद केला होता.तो रस्ता प्रशासनाने पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला केला होता. मात्र वाहनांमुळे रस्त्याच्या कामाला अडचणी येत असल्याने पुन्हा एकदा महाड भोर हत्तीवर वरणगाव घाटात मोठ मोठ्या दगडी लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
भोर -वरंधा घाट भोर बाजूने पूर्णता वाहतुकीसाठी सुस्थितीत असला तरी महाडबाजूने घाट रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामाला ये-जा करणाऱ्या वाहनांचा अडथळा येत असल्याने पुढील काही दिवसांसाठी घाट रस्ता बंद केला आहे. वरंधा घाट रस्ता बंद केल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने प्रवासी भोरवरून महाडकडे रवाना होत आहेत.मात्र वरंधा घाटात महाड हद्दीवर दगडी लावल्याने पुन्हा प्रवाशांना भोरला यावे लागत असल्याने प्रवाशांना ८० किलोमीटरचा प्रवास वाढल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे.प्रशासनाकडून वरंधा घाट रस्ता बंद ठेवण्याचे आदेश आलेले नाहीत.त्यामुळे रस्ता बंद असल्याचे फलक लावण्यात आले नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सदानंद हल्लाळे सोमेश्वर रिपोर्टर बोलताना म्हणाले.