Baramati News l निरामय मेडिकल फाउंडेशन उचलते हॉस्पिटलचा २५ टक्के खर्च : निंबुत येथे आरोग्य शिबीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी
शांताबाई देशपांडे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि ग्रामपंचायत निंबुत यांच्यावतीने आज हृदयरोग तपासणी शिबिर व स्त्रीरोग तपासणी शिबिर संपन्न झाले शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत नींबूत सरपंच निर्मला काळे ग्रामसेवक काळभोर व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आले
        बारामतीतील सुप्रसिद्ध डॉ. अशोक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित केले होते त्याचबरोबर त्यांच्या सुनबाई ज्या जर्मनीवरून शिक्षण घेऊन केरळमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या अशा या अपूर्वा देशपांडे आज सासऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांच्या समस्या जाणून, गर्भपिशवीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या अनेक समस्या त्याच्यावरती प्रकाश टाकून आजच्या आधुनिक काळातील उपचार त्यांना देता यावे यासाठी बारामतीमध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात महागड्या व आधुनिक पद्धतीच्या मशनरी बारामती मध्ये उपलब्ध करून सर्व महिलांसाठी तसेच  असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करणाऱ्या महिलांसाठी गावोगावी जाऊन त्यांचे समस्या जाणून घेऊन  उपचार करण्यासाठी जात आहेत. 
            त्याचबरोबर निरामय मेडिकल फाउंडेशन या संस्थेमार्फत गोरगरिबांचा 25% खर्चाचा भार उचलून त्यांना मदत देण्यासाठी देशपांडे हॉस्पिटल झटत आहे आज नींबूतमध्ये शेकडो महिला व पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेऊन अनेक रुग्णांना या उपचारांचा लाभ  झाला आहे त्यामुळे येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे या कामी डॉ  आदित्य देशपांडे  डॉ पल्लवी चव्हाण डॉक्टर अशितोष दोशी. यांचे सहकार्य लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. भाऊ कोळेकर     राजेंद्र काकडे आशा वर्कर. ग्रामपंचायत कर्मचारी. परिचारिका यांनी या कामी सहकार्य केले
To Top