सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील सुट्टे पैसे मागण्याच्या बहाण्याने आलेल्या एका व्यक्तीने दुकानातील बारावीत शिकत असलेल्या आदित्य पवार याला हिप्नॉटिझम करत दुकानाच्या गल्ल्यातुन २० हजाराची रोकड पळवली.
वाणेवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयापुढील श्री मोरया पशुखाद्य सेंटर या दुकानात साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत मयूर शरद पवार रा.वाणेवाडी यांनी ही माहिती सोमेश्वर रिपोर्टरला दिली.
चारच दिवसांपूर्वी करंजेपुल येथे एका वृद्धाला फसवल्याची घटना घडली आहे.