Bhor News l शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खते..बियाण्यांच्या तक्रारींसाठी भोर तालुक्यात भरारी पथके

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
खरीप हंगामात भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरात पुरवठा व्हावा.तसेच याबाबतच्या तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यासाठी कृषी विभागाकडून तालुका पातळीवर भरारी पथक स्थापन केले आहे. अशी माहिती पथक प्रमुख तथा तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड व सदस्य सचिव तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शिवराज पाटील यांनी दिली.
     पाच सदस्यीय भरारी पथकात वजन माप निरीक्षक कृषी मंडळ भोर नंबर एक ,भोर नंबर दोन व नसरापूर येथील कार्यालयातील कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी खते, बी बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी.तसेच खते, बी बियाणे याविषयीच्या असणाऱ्या तक्रारींसाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.भोर तालुक्यात कृषी सेवा केंद्रे, खते,बी बियाणे औषधे व कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या ४६ इतकी आहे. दुकानदारांना पॉस मशिनद्वारे खते विक्री करण्याची सूचना दिली गेली आहे. पथकामार्फत निकृष्ट दर्जाचे व वाढीव दराने खते विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवण्यात येणार असून खत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या, जादा दर मागणाऱ्या तसेच पक्की पावती न देणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार आहे.पथकाच्या माध्यमातून दुकानांची तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.दोषी दुकानदाराचा परवाना रद्द करणे, फसवणुकीचा गुन्हा दाखल करणे आदी स्वरूपाची कठोर करवाई करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी संजीवन गायकवाड यांनी सांगितले.

                                     
To Top