सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मार्च २०२४ एस.एस.सी बोर्ड परीक्षेत सर्व शाळांत मुलींचाच दबदबा पाहायला मिळाला. बारामती तालुक्यातील सोमेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी दत्तात्रय वाघमारे हिने ९६.००% गुण संपादन करून सोमेश्वरनगर-वाणेवाडी केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला.
गणित या विषयात तन्वी १०० पैकी तब्बल ९९ गुण मिळवत राज्यात दुसरी आली. तर सोमेश्वर विद्यालयाच्या करंजे भाग शाळेत मानसी संताजी गायकवाड या विद्यार्थिनीने ९२.००% गुणांसह प्रथम क्रमांक प्राप्त करत मुलीच सरस असल्याचे दाखवून दिले.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सोमेश्वरनगर हे शैक्षणिक हब म्हणुन उदयास आले आहे. यंदा सोमेश्वर विद्यालयाचे २०७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. विद्यालयाचा निकाल ९७.५८ टक्के लागला.
यामध्ये तन्वी दत्तात्रय वाघमारे ९६.००% गुणांसह प्रथम क्रमांक, मानसी संताजी गायकवाड व प्रथमेश सचिन जगताप दोघेही ९२.००% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर मयुरेश दत्तात्रय खैरे याने ९०.८०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
विशेष बाब म्हणजे यंदा ८५% पेक्षा जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय पाहायला मिळाली.
विद्यालयाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, सचिव, प्राचार्य, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.