सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
कारी ता.भोर येथील सृष्टी नेताजी कंक हिने इयत्ता दहावीत ९४.८० टक्के गुण मिळवून राजगड ज्ञानपीठ संचलित भोरमधील जिजामाता माध्यमिक विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला.तर द्वितीय ईश्वरी श्रीकांत पाटील ९२.८० टक्के,तृतीय श्रावणी संजय शिवतरे ९२ टक्के मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानपीठाचे कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपा थोपटे व प्राचार्य प्रभाकर खेडकर यांनी अभिनंदन केले. प्रथम क्रमांक आलेल्या सृष्टी हिला महाराष्ट्र शासन व जिल्हापरिषदेचे आदर्श पुरस्कार विजेते पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असलेले आजोबा शिवाजी कंक तसेच जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असलेल्या आई वर्षा कंक व वडिल नेताजी कंक यांचे मार्गदर्शन लाभले.तिचे कारी व पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
COMMENTS