पुरंदर l तीन वर्षांच्या कारभाराच्या सखोल चौकशीचे आदेश : कर्नलवाडी शरद-विजय सोसायटी गैरव्यवहार प्रकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथील शरद-विजय सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरण गंभीरपणे घेत पुणे जिल्हा बँकेने व सहकार खात्यानेही सरकारी लेखापरीक्षक नेमून तीन वर्षांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे आता नेमका गैरव्यवहार कसा व किती झाला आहे तसेच कोण जबाबदार आहे हर उजेडात येणार आहे.
        कर्नलवाडीमधील शरद-विजय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत पुणे जिल्हा बँकेच्या नीरा शाखेद्वारे सुमारे शंभर शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला गेला. संचालक मंडळाच्या आणि जिल्हा बँकेच्या नीरा शाखेतील अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे गेली दोन-तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. याबाबत  काही शेतकऱ्यांनी आवाज उठवला. त्यामुळे संबंधित विभाग जागे झाले असून चौकशीची त्रिस्तरीय प्रक्रिया सुरू झाली आहे. सोसायटीच्या वतीने अंतर्गत लेखापरीक्षण नियमित होणार आहे, जिल्हा बँकेद्वारे नीरा शाखेतून झालेल्या कामकाजाची चौकशी होईल तर सहकार खाते मागे जाऊन तीन वर्षांची चौकशी करणार आहे. 
सहकार खाते सलग तीन वर्षांचे ऑडिट करणार आहोत. तालुका ऑडिटर कुलकर्णी यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. तसेच तपासणी करण्यासंदर्भात  बँकेलाही पत्र देण्यात आले आहे.
         जिल्हा बँकेकडून, मागील वर्षाच्या तपासणीत बँकेच्या अधिकाऱ्यांना 32 लोकांच्या नवे अनियमित कर्जे आढळली होती. ती शेतकऱ्यांच्या दबावाने व काही अधिकारी व अंतर्गत लेखापरीक्षक यांच्या पाठपुराव्याने भरून घेण्यात आली आहेत. आताच्या आर्थिक वर्षात अशी प्रकरणे तपासणी चालू होती आणि त्याचीही रिकव्हरी करून घेतली जात आहे. आता बँक व सहकार कडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
To Top