Rajgadh News l तालुक्यातून दहावीच्या परीक्षेत समृद्धी आधवडे प्रथम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे ; मिनल कांबळे
वेल्हे तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत राजगड ज्ञानपीठाचे नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे येथील कुमारी समृद्धी संपत आधवडे हिने 94.20% गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे, 
            संस्थेचे संचालक आमदार संग्राम थोपटे यांनी समृद्धीचे अभिनंदन केले आहे. वडील संपत आथवडे व आई संगीता आधवडे हे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालयात ही मुलगी शिकत असून प्राचार्य बाजीराव पवार व वर्गशिक्षक रोहिदास तनपुरे यांनी समृद्धीस मार्गदर्शन केले आहे, तिच्या या यशाबद्दल तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे 
दहावी हा प्रत्येकाच्या आयुष्याचा  महत्त्वाचा टप्पा असतो,तो पार करण्यासाठी प्रत्येक जण आप आपल्या परीने प्रयत्न करत असतो.असाच प्रयत्न करण्यासाठी मी दहावीच्या सुरवाती पासूनच प्रयत्न करायचे असे ठरवले व ते केले देखील.
या प्रवास दरम्यान मला माझ्या आई वडिलांनी,शिक्षकांनी त्या सोबतच शाळेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
मी दिवसभरातून जवळपास ९ तास अभ्यास करायचे त्या सोबतच शिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पणे पालन केले.
 परीक्षे दरम्यान आलेली चिंता दूर करायची ती माझ्या मोठ्या भावाकडून शिकले. या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून मी हे यश संपादन करू शकले . भविष्यात मी डॉक्टर व त्यानंतर IAS officer होऊन लोकांची सेवा करू इच्छिते  असे यावेळी समृद्धीने बोलताना सांगितले, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे येथील प्रथम चार क्रमांक पुढीलप्रमाणे 
१) समृद्धी संपत आधवडे 94.20%
२)) मोनाली सुहास गुरव 90%
 ३) तन्वी लहू शेंडकर 81.20℅
४) संस्कृती रोहिदास शेंडकर 80.40%
To Top