पुरंदर l तालुक्यातील पिंपरे बु , गुळूंचे, व नीरा कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये पुरंदर तालुक्यातील गुळूंचे, पिंपरे बु, कन्या शाळा निरा विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे तर महात्मा गांधी विद्यालयाचा निकाल,91.66% लागला आहे. 
       बा. सा. काकडे विद्यालय पिंपरे बु विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा याही वर्षी कायम राहिली. विश्व भगवान कुसेकर 91.60% गुण मिळवत प्रथम, वैष्णवी दत्तात्रय थोपटे 86.60% गुण मिळवत द्वितीय आणि अलबाज अल्ताफ शेख 86.40% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे,  उपाध्यक्ष भीमराव बनसोडे, सचिव मदनराव काकडे, मुख्याध्यापक कैलास नेवसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
         ज्योतिर्लिंग हायस्कूल गुळूंचे विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून, अनुक्रमे निगडे आदित्य अजित 90.80% गुण मिळवत प्रथम, रणवरे अवधूत शिवाजी 86.60% गुण मिळवत द्वितीय, आणि निगडे आर्या संतोष 85.20% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सतीश शेठ उरसळ, कार्याध्यक्ष अजितराव निगडे, प्राचार्य राहुल येळे अभिनंदन केले. 
      सौ लीलावती रिकावलाल शहा कन्या विद्यामंदिर नीरा शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, कदम इशिता शैलेंद्र, व  किकले श्रेया मिलिंद 94.00% गुण मिळवत प्रथम, गायकवाड श्रावणी गणेश 92.60% गुण मिळवत द्वितीय आणि मोहिते स्नेहा रवींद्र 92.40% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका श्रीमती नायकोडी निर्मला गोपीनाथ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी केले.
   महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय  निरा विद्यालयाचा निकाल 91.66% लागला असून, तांबोळी मुजम्मिल समीर 89.50% गुण मिळवत प्रथम, गालींदे सतीश हर्ष 87.60% गुण मिळवत द्वितीय आणि कहार सुमित महेश 86.60% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य, शाळा व्यवस्थापन व विकास समिती,शिक्षक पालक संघ, माता पालक संघ,व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले.
To Top