सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुलींनीच बाजी मारली.
बा.सा. काकडे विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी- मुरूम या विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला. निंबुत येथील बा. सा. काकडे विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. वेदांत चंद्रकांत केंजळे ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम, मेघराज सनी निगडे याने ८६ टक्के गुण मिळवत द्वितीय आणि साहिल दादासाहेब गोंडे ८५.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे, उपाध्यक्ष भीमराव बनसोडे, सचिव मदनराव काकडे, मुख्याध्यापिका दिपाली ननावरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी -भागशाळा मुरूम या दोन्ही विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. तिन्ही क्रमांक मुलींनीच पटकावले.
वाणेवाडी विद्यालयात अंकिता युवराज शिंदे या विद्यार्थिनीने ९५.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रावणी सचिन उगले हीने ९४.८० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि सानिका माणिक शिंदे हीने ९३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
मुरूम भागशाळेत श्रावणी विजय सर्जे हीने ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम, साक्षी मनोहर चव्हाण हीने ८७.८० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि अवधूत राजू घोरपडे याने ८३.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. सोरटेवाडी येथील माध्यमिक विद्यालय करंजे शाळेचा ९६.५५ टक्के निकाल लागला. आर्यन नवनाथ जाधव याने ८८.८० टक्के गुण मिळवत प्रथम, शुभम राहुल होळकर आणि ओमराज संतोष गोडसे दोन विद्यार्थ्यांनी ८७.२० टक्के गुण मिळवत द्वितीय आणि सुरज लालासाहेब होळकर यांनी ८०.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडीने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. हरीओम म्हाळसाकांत धायगुडे या विद्यार्थ्यांना ९०.८० टक्के गुण मिळवत प्रथम, प्रशांत दादा कराडे याने ८४.८० टक्के द्वितीय आणि सृष्टी मनोज गायकवाड हीने ८३.२० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. सोमेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय सोमेश्वरनगर या विद्यालयाचा निकाल ९७.५८ टक्के लागला आहे. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सचिव भारत खोमणे, प्राचार्य पी. बी. जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.