राजगड l वेल्ह्यात चार विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे ; मिनल कांबळे
वेल्हे तालुक्यातुन इयत्ता १० वीच्या परिक्षेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा विद्यालय वेल्हे व राजगड ज्ञानपीठाचे दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी, गुंजवणी शिक्षण संस्थेचे राजगड विद्यालय वाजेघर,आणि तोरणासागर विद्यालय निवी या चार विद्यालयाचा निकाल
शंभर टक्के लागला आहे.तालुक्यातुन ५८५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी ५७१ विद्यार्थी पास झाले असुन तालुक्याचा एकुण निकाल ९७.६० टक्के लागला आहे.
       तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढीलप्रमाणे 
१) तोरणा विद्यालय वेल्हे १०० टक्के
२) दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी १०० टक्के 
३)  राजगड विद्यालय वाजेघर १०० टक्के 
४) तोरणासागर विद्यालय निवी १०० टक्के
५) सरस्वती विद्यालय अंबवणे ९९.१५ टक्के
६) तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे ९७.१४ टक्के
७) न्यु इंग्लिश स्कुल पासली ९६.४९ टक्के
८) वीर बाजी पासलकर हायस्कुल पानशेत ९५.६५ टक्के
९) राजे शिवछत्रपती विद्यालय सोंडे माथना ९५.४५ टक्के
१०) न्यु इंग्लिश स्कुल विंझर ९४.११ टक्के
११) मातोश्री देडगे विद्यालय रुळे ९४.११ टक्के
To Top