सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील नवनाथ चित्रपट गृहात भुंडीस चित्रपटाचे कलाकार भरत शिंदे (बाळासाहेब ), रामभाऊ जगताप, सुभाष मदने हे उद्या रविवारी दि. २६ रोजी रात्री ९ वाजता उपस्थित राहणार आहेत. तरी संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेला भुंडीस चित्रपट पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन नवनाथ सिनेमाचे प्रमुख गोपाळ चव्हाण यांनी केले आहे.
गावगाड्यातील कलाकार वेबसिरीजच्या माध्यमातून मोबाइलद्वारे यु ट्यूबचे माध्यम वापरून आपल्या अभिनयच्या करामती दाखविण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्या अभिनयची दखल चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तसेच लेखकांनी घेतली आहे.याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावच्या कलाकारांचे देता येईल.सध्या यु ट्यूबला सर्वात लोकप्रिय असलेली चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीजचे देता येईल.या वेबसिरीजचे मुख्य कलाकार भरत शिंदे उर्फ बाळासाहेब,रामभाऊ जगताप,सुभाष मदने, यशराज डिंबळे, कुमार पाटोळे,माणिक काळे या ग्रामीण कलाकारांच्या कसदार अभिनयाने समाजातील वास्तव चित्र दाखविण्याचे काम भुंडीस चित्रपटाद्वारे करण्यात आले असल्याचे मत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी पुणे येथे व्यक्त केले.
ए स्क्वेअर ग्रुप निर्मित 'भुंडीस' चित्रपट १७ में रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण सोहळा गुडीपढव्याच्या मुहूर्तवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे थाटात पार पडला.अभिनेता यशराज डिंबळे,चांडाळ चौकडीच्या करामती फेम भरत शिंदे उर्फ बाळासाहेब,रामभाऊ जगताप,सुभाष मदने,सुरेखा गव्हाणे,माणिक काळे, कुमार पाटोळे, अश्विन तांबे, अनुष्का बेनके, अविनाश कीर्ती, शीतल आदमाणे, श्रीकृष्ण भिंगारे , काका शिरोळे आदी कलाकारांनी हजेरी लावली होती.
चित्रपटाबद्दल सांगताना लेखक सोमनाथ तांबे सांगतात की,हा सिनेमा लिहीत असताना लहानपणापासून जे अनुभवले, जे सोसले ते शब्दरुपी या सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 'भुंडीस' चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमात अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत असून नक्कीच प्रत्येकाला ते प्रश्न स्वत:चे वाटतील.खूप सुंदर सिनेमा झाला असून प्रत्येकाने आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहावा अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
निर्माते दत्ता बापुराव दळवी यांनी सांगितले की,'भुंडीस'चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्यांच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे.या चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेवून जातो. चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल.या कथेद्वारे सामान्यातून असमान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते.ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे. सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि उर्जेचा स्त्रोत घेवून बाहेर पडेल याबाबत दुमत नाही.
COMMENTS