सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - आंबाडे मार्गावर रस्ता दुपदरी करण्याचे काम मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे.रस्त्याचे काम आंबाडे बाजूने खानापूर पर्यंत एक बाजूचे काम पूर्ण होत आले आहे.मात्र रस्त्याचे काम सुरू असतानाच सिमेंटच्या पहिल्या थराचे काम भाबवडी ता.भोर पुलानजीक ५० फुटापर्यंत चिरटल्याने काहीशा प्रमाणात रस्त्याचा भाग खचला आहे.
भोर - आंबाडे रस्त्याच्या कामाला गती आली असली तरी रस्त्याच्या साईड पट्टीचा तसेच रस्त्यावरील महत्त्वाचा भाग ठीक-ठिकाणी खचत असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गोकवडी येथील रस्त्याच्या कडेचा भरावा तसेच भाबवडीच्या तुला जवळील सिमेंटचा कच्चा रस्ता कशामुळे खचला आहे याची संबंधित ठेकेदाराने पाहणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. तर अनेक ठिकाणी वाहनांना ये -जा करण्यासाठी वाहतुकीच्या रस्त्यावर आलेल्या मोठमोठ्या दगड गोट्यांचा अडथळा निर्माण होत असल्याने तसेच बहुतांशी ठिकाणी रस्ता असल्याने वाहन चालकांची जोरदार भांडणे होत असल्याचे प्रकार घडत आहेत.या पार्श्वभूमीवर भोर -आंबाडे रस्त्याच्या ठेकेदारांनी एक साईडचा रस्ता वाहनचालकांना सुरक्षित जाण्या- येण्यासाठी खुला करून द्यावा अशी ही मागणी होत आहे.
COMMENTS