सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे.
निरा मोरगाव मार्गावरती बोलेनो व स्प्लेंडर यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन स्प्लेंडर गाडीवरील दोघांना जबरदस्त मार लागला असून दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना लोणंद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नीरा मोरगाव मार्गावरती बोलेनो गाडी क्रमांक एम एच 16 CQ 39 49 गाडीतून नारायण चौधर ता.अहमदनगर (पाथर्डी) कुटुंबासह वाई मध्ये कौटुंबिक भेट घेण्यासाठी निघाले असता निरा मोरगाव मार्गावरती निरा डाव्या कालव्याच्या पुला शेजारी वळणावरती निरेहुन मोरगावला निघालेले नारायण मलगुंडे व करे (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे आपल्या स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच 11 बी डब्ल्यू 60 49 वरून मोरगावला निघाले होते. रस्त्यावर अचानक साप आडवा आल्यामुळे त्याला चुकवण्याच्या नादात समोर धडक झाली यामध्ये बोलेरो गाडीने स्प्लेंडर चा पुढच्या चाकाचा चक्काचूर केला. गाडीवरील दोघांनाही डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे स्थानिक नागरिकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने त्यांना लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.
नुकतेच निरा मोरगाव रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरती वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे याच रस्त्याने शिर्डी, शनिशिंगणापूर या देवस्थाना जाण्यासाठी नागरिक या मार्गाचा वापर करतात तसेच एमआयडीसीला जाणारा कच्चा माल अवजड याच मार्गाचा वापर करतात वाहतूक वाढल्यामुळे या मार्गावरती निरा डाव्या कालव्या पूला शेजारी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा केली आहे याच ठिकाणी गेल्या सहा महिन्यात अनेक अपघात घडले असून अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत