सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - आंबाडे मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू असून भोरवरून आंबाडेकडे जाताना रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा मालवाहतूक करणारा डंपर स्टेरिंग लॉक झाल्याने पोळवाडी ता.भोर फाट्यानजीक भात खाचरात १० ते १५ फूट खोल खड्ड्यात कोसळला.नशीब बलवत्तर म्हणून चालक तसेच समोरून येणाऱ्या वाहनातील प्रवासी बचावल्याने अनर्थ टळला.
भोर - आंबाडे रस्त्याचे काम जलद गतीने सुरू असले वाहन चालकांना इजा करण्यासाठी एक साईड मोकळी ठेवण्यात आले आहे. मात्र या एक साईडच्या कच्च्या रस्त्यावर मोठ- मोठे दगड गोटे तसेच खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागते. रस्त्याच्या कामावरील मालवाहतूक डंपर अंबाडी येथे खडी घेऊन जात असताना पोळवाडी येथील चढाला डंपरचे स्टेरिंग लॉक झाल्याने गाडी उजव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली.डंपरचा चालक बचावला.संबंधित ठेकेदाराने वाहनचलकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच मोठ मठे दगड गोटे बाजूला करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
COMMENTS