सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यात एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा हात पकडून छेडछाड केल्याने याची फिर्याद भोर पोलिसात पिढीतेच्या नातेवाईकाने दिली.गणेश शिवाजी भडाळे रा.आंबवडे ता.भोर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि.१९ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आरोपी याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहित असताना देखील पीडित मुलीचा पाठलाग करून तिला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिचा हात पकडला.तसेच मानस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तू जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला मारेल अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.