सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
31 मे 2024 ला जगामध्ये धूम्रपान निषेध दिवस म्हणून संबोधित केला जातो. तरी या विषयाला इतके महत्त्व देण्याचे कारण काय असे आपणास वाटत असेल परंतु तंबाखूजन्य पदार्थ व तंबाखूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या जगभरामध्ये किमान 80 लाख प्रति वर्ष यापेक्षा जास्त आहे.
त्यामुळेच या तंबाखूजन्य विष थांबवण्याची गरज वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन वाटली त्याकरिता 1987 साली तंबाखूजन्य पदार्थांमुळे वाढणारे मृत्यू लक्षात घेता 1988 पासून 31 मे हा दिवस दरवर्षी जनजागृती करण्याकरिता साजरा केला जातो .
आपल्या ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा तंबाखूचे सेवन करताना आढळतात तंबाखूचे सेवनाच्या पद्धतीमध्ये धूम्रपान असेल विडी असेल सिगारेट असेल तंबाखूचे मिश्री असेल किंवा इतर तत्सम पदार्थ असतील यांचा समावेश केला जातो.
तंबाखू मधील असणाऱ्या निकोटींमुळे शरीराला व मनालाही अतिशय तीव्र प्रकारचे नशा सुरू होते या नशेतूनच शरीरावरती विविध प्रकारचे हानी व्हायला सुरू होते याच्यामध्ये हृदयाला होणारे आजार याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये येणारे अडथळे ब्लॉकेजेस किंवा रक्तवाहिन्यांमध्ये atherosclerosis शिरा काठिण्याता चे प्रमाण जास्त होते आणि परिणामी बीपी वाढणे हार्ट अटॅक येणे मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्राव होणे इत्यादी प्रकार होण्याची दाट शक्यता असते.
फुफुस निकामी होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो शुगर वाढणे दमा खोकला होणे इत्यादी जीव घेणे आजार होऊ शकतात. याचप्रमाणे तंबाखू शरीरावर परिणाम करत असताना मनावरती ही त्याचा विपरीत परिणाम होतो हे आपण समाजामध्ये पाहतच आहोत.
----------------
हा लेख आपणा सर्वांच्या करिता सोमेश्वर रिपोर्टर व साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू यांच्या संयुक्त विद्यमाने जेनितार्थ जारी.