निरा : प्रतिनिधी
नीरा ता. पुरंदर येथील अजित सोनवणे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीच्या सदस्य पदी निवड करण्यात आले आहे
तशा आशयाचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले यापूर्वी अजित सोनवणे हे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा युवक उपाध्यक्षपदी कार्यरत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षाचा विचार तळागाळातील सर्वसामान्य पर्यंत पोहोचवून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यांच्या निवडीने नीरा परिसरामध्ये
आनंदोस्तव साजरा करण्यात आला