बारामती l निंबुत येथे गुरुवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : प्रतिनिधी  
निंबुत ता. बारामती येथे ग्रामपंचायत निंबूत व शांताबाई देशपांडे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी दिनांक 16 रोजी मोफत स्त्रीरोग व हृदयरोग आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती युवा नेते गौतम काकडे उपसरपंच अमर काकडे यांनी दिली 
          या शिबिरामध्ये जर्मनी मध्ये विशेष प्राविण्य मिळवून केरळमध्ये आरोग्य दूत म्हणून असामान्य असामान्य कामगिरी करणाऱ्या 
डॉक्टर अपूर्वा देशपांडे व डॉक्टर अशोक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निंबुत गावातील महिलांसाठी स्त्रीरोग विषयक तपासणी व पुरुषांसाठी हृदयरोग मोफत शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर ग्रामपंचायत निंबूत येथील कार्यालयात गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत असल्याची माहिती संयोजकांनी दिली तरी या शिबिराचा लाभ निंबूत व नींबूत परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
To Top