सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळेच्या आदर्श शिक्षिका वाघळवाडी (ता. बारामती) येथील शारदा भाऊसाहेब निगडे (वय ७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने यश मिळविणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती होती. सोमेश्वरनगर जिल्हा परिषद शाळेत सेवा सुरू केली आणि पालकांच्या प्रतिसादामुळे तिथेच 2012 साली निवृत्त झाल्या. एकाच शाळेवर पूर्ण सेवा करणाऱ्या त्या जिल्हा परिषदेच्या एकमेव शिक्षिका होत्या. तिथे त्यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांनाही शिक्षण दिले होते. त्यांचे विद्यार्थी आयआयटी, प्रथम श्रेणी अधिकारी पदापर्यंत पोचले.
पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष उत्तम निगडे यांच्या त्या भगीनी होत. तर तृप्ती संदीप जेधे (नाटंबी ता. भोर) यांच्या त्या मातोश्री होत.
COMMENTS