Baramati News l विद्युत तारांच्या घर्षणाने मुरूम येथे ऊस जळाला : आता कारखाने देखील बंद झाले... जळालेल्या उसाला कोण वाली ?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
मुरूम (ता. बारामती) येथील विद्युत खांबांच्या तारांना पडलेल्या झोळात  घर्षणाने लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांचा ऊस जळाला. 
              मुरूम रस्त्यावरील तळवणीनगर येथील डीपीजवळील खांबावरील तारांना मोठ्या प्रमाणात झोळ पडले आहेत. सोमेश्वरनगर येथील महावितरणच्या कार्यालयाकडे याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हाऊस जळाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.  मुरूम येथील शेतकरी फत्तेसिंह जगताप यांचा पाऊण  एकर ऊस तसेच बाबुराव गुरव यांचा अर्धा एकर ऊस या आगीत भस्मसात झाला आहे. या आगीत दोन शेतकऱ्यांचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरात अनेक तारांना झोळ पडले आहेत. महावितरणकडे वारंवार तक्रार करूनही कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने उजळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. फोन करूनही वायरमन संबंधित ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे वायरमन बदलून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
To Top