सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचा सी.बी.एस.ई. १०वी आणि १२वीचा वार्षिक निकाल हा १००% लागला असून यावर्षी विदयार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
इयत्ता १२ वी विज्ञान शाखेमधून समिधा संतोष दरेकर या विदयार्थीनीने ९३.२०% इतके गुण मिळवुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला तर इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेमधून साक्षी योगीराज खोमणे हिने ९१.४०% इतके गुण मिळवुन प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. इयत्ता १२वी विज्ञान शाखेमधून सर्वच्या सर्व मुलांना ७०% आणि अधिक गुण मिळाले आहेत.
१२वी विज्ञान शाखेमधून साक्षी जाधव व प्रणाली शिंदे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला तसेच १२वी वाणिज्य शाखेमधून आदित्य वर्तक व पृथ्वीराज म्हेत्रे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत देखील शाळेने आपल्या १००% निकालाची परंपरा अबाधित ठेवली आणि अतिशय नेत्रदीपक यश संपादन केले. दहावीच्या परीक्षेमध्ये पुष्कर जितेंद्र धायगुडे याने ९५.६०% संपादित करून प्रथम क्रमांक पटकाविला तर स्मित जगताप, प्रणाली खोडके व अरमान इनामदार, शिवम गावडे यांनी अनकमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला. ग्रामीण भागातील विदयार्थ्यांनी राष्ट्रीय अभ्यासक्रम परीक्षांमध्ये असे यश संपादित केल्याने विदया प्रतिष्ठान संस्थेचे सर्व कार्यकारी मंडळ, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन केले.