Baramati Breaking l निंबुत गोळीबार प्रकरणातील मोठी बातमी : जखमी रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी दि. २७ रोजी रात्री गोळीबार झाला होता. यामधील फलटण येथील रणजित निंबाळकर हे जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान रात्री २ वाजता पुणे येथे मृत्यू झाला आहे.
            शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या सुंदर नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे काल दि. २७ रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून तुझं माझं होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांचेकडून गोळीबार झाला. यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचरादरम्यान त्यांचा दि. २८ रोजी रात्री २ वाजता मृत्यू झाला आहे. दरम्यान रणजित निंबाळकर यांची पत्नी अंकिता निंबाळकर यांनी वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौतम शहाजीराव काकडे, गौरव शहाजीराव काकडे व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To Top