Javali News l चारचाकी व दुचाकीत झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी : सातारा-केळघर रस्त्यावरील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
आंबेघर तर्फ मेढा गावच्या हद्दीमध्ये सातारा-केळघर रोडवर स्विफ्ट कार व दोन चाकी वाहनामध्ये भिषण धडक होवून एकाचा जागीच मृत्यु झाला असून दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची नोंद मेढा पोलीस ठाण्यात झाली असून अपघातास कारणीभुत ठरलेल्या स्विफ्ट कार चालक सतीश दगडू सावले रा. भामघर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मेढा पोलीसांनी दिली.
          याबाबात पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, सकाळी 07.30 चे सुमारास मौजे आंबेघर तर्फ मेढा ता. जावली गावचे हद्दीत केळघर ते सातारा जाणारे रोडवर काळे रंगाची स्विफ्ट कार क्रमांक एम एच 43 एल 3750 वरील चालक सतीश दगडू सावले रा. भामगर, ता. जावली याने स्विफ्ट कार हयगयीने व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून समोरून येणारी लुना मोटरसायकल क्रमांक एम एच 11 सी वाय 5283 हिस जोरदार धडक दिली. स्विफ्ट कारने एवढया जोरात धडक दिली की त्यावरील चालक प्रवीण कोंडीबा कासुर्डे, वय 37वर्ष, रा. वरोशी, तालुका जावली याचा जागीच मृत्यु झाला. तसेच मोटरसायकलचे पाठीमागे बसलेला सिद्धार्थ संतोष कदम, वय 17 वर्ष, रा.  वरोशी, तालुका जावली हा गंभीर जखमी झालेला आहे.
               याबाबत मेढा पोलीस ठाणे येथे स्विफ्ट वरील चालक याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांची मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी पाटील या तपास करीत आहेत.
              प्रवीण कोंडीबा कासुर्डे यांचे वडील दुधाचा व्यवसाय करीत होते. वडील कोंडीबा कासुर्डे हे वयस्कर झाल्याने वडीलांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी प्रवीण याने मुंबई येथिल नोकरी सोडून गावी राहीला होता. वरोशी ते मेढा असा प्रवास करून रोज दुध विक्री करीत होता. सर्वांशी मन मिळावु पणे वागणाऱ्या शांत व संयमी प्रवीणला अपघात होवुन मृत्यु झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच हळहळ व्यक्त करण्यात आली तर जखमी सिद्धार्थ कदम हा इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे.
To Top