जावळी न्युज l धनंजय गोरे l रेशनिंग वितरकांनी ईकेवायसीचे पैसे घेतलेस होणार कठोर कारवाई

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------ 
जावली : धनंजय गोरे 
जावली तालुक्यातील सर्व रेशनिंगकार्ड धारकांनी ई. केवायसी संदर्भात कोणीही रेशनिंग दुकानदारास पैसे देऊ नये तसेच रेशनिंगचा तांदुळ हा प्लास्टिक नसून तो पोषक असलेची माहिती जावळीचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.
        जावळीतील बरेच रेशनिंग वितरक ग्राहकांकडून केवायसीचे नावाखाली लूट करीत आहेत. सर्व रेशनिंग वितरकांनी प्रत्येक व्यक्तीची ई. केवायसी मोफत करून घेणे बंधनकारक आहे ई केवायसी मोफत असून रेशनिंग वितरकांनी कोणीही रेशनिंग धारकांचेकडून पैसे घेऊ नये, अन्यथा त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा जावळीचे तहसिलदार यांनी दिला रेशनिंगचा तांदुळ हा प्लास्टिकचा नसून तो पूर्णपणे पोषक असून जावली तालुक्यातील नागरीकांनी गैरसमज करुन घेऊ नये, असे आवाहन तहसीलदार जावली यांनी केले आहे
         इ. केवायसी बाबत तक्रारीचे निवेदन रेशनिंग कार्ड धारकांनी तहसिलदार यांना दिले. त्याप्रसंगी प्रकाश कदम माजी उपसरपंच मेढा, जिल्हा चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), सुरेश दळवी चेअरमन मेढा सोसायटी, अरुण जवळ, सामाजिक कार्यकर्ते, आनंदराव दळवी, प्रशांत दळवी तसेच व पत्रकार युवराज धुमाळ, शेखर जाधव, जितीन वेंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top