सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
एफआरपी बरोबर एमएसपी मध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी मदत होणार असून त्याच बरोबर साखर कारखाने आर्थिक रित्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.
मागील १५ वर्षाचा विचार केला तर एफआरपी मध्ये अनेकदा वाढ झाल्याचे दिसते पण एमएसपीमध्ये अधिक ची वाढ झालेली दिसत नाही. २००९-१० साली ९.५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन १२९८ रुपये आणि त्या पुढील प्रत्येक टक्यासाठी १३७ रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली होती. २०२३-२४ साठी १०.२५ टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन ३१५० रुपये व पुढील प्रत्येक टक्यासाठी ३१५ रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली.
२००९-१० साली साखरेचा किमान दर २५९६ प्रती क्विंटल होता. २०२३-२४ साठी साखरेचा किमान दर (एमएसपी) ३१०० रुपये प्रति क्विंटल आहे.
मागील १५ वर्षांचा विचार केला तर एफआरपी मध्ये प्रतिटन १८५२ रुपयांची वाढ झालेली दिसते आणि एमएसपी मध्ये फक्त ५०४ रुपयांची वाढ झालेली दिसते. एफआरपी च्या तुलनेत एमएसपी ची वाढ ही खूप कमी झाल्याचे दिसून येते त्याच बरोबर एमएसपी पेक्षा एफआरपी मध्ये ५० रुपयांची अधिक वाढ झालेली दिसून येते.
केंद्र शासनाने उसाचा प्रतिटन उत्पादन खर्च १५७० रुपये जमेला धरून धरून एफआरपी ठरवल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या तुलनेत गेल्या १५ वर्षा मधे ऊस उत्पादन घेण्यामधे झालेली भरवी अशी वाढ दिसत आहे त्या तुलनेत केंद्र शासनाने एमएसपी मध्ये वाढ केलेली दिसत नाही. हंगामाच्या सुरुवातीला असणारा साखरेचा दर वर्षभर स्थिर राहत नाही. मागील दोन वर्षात साखरेचे दर हे एमएसपी च्या आसपासच राहिलेले दिसतात.
साखरेचे दर एमएसपी च्या आसपासच राहिले तर याचा परिणाम साखर कारखान्यांना एफआरपी देण्यावरही होत असतो. महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी ची रक्कम देणेही अवघड होते. २०२४-२५ गळीत हंगामासाठी साठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३४०० रुपये व पुढील प्रत्येक टक्यासाठी ३४० रुपये एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. सध्यातरी साखरेचा किमान दर (एमएसपी) ३१०० रुपये प्रति क्विंटलच आहे.
एफआरपी ही एमएअपी पेक्षा अधिकच वाढत चालली आहे. म्हणून या बाबत साखर उद्योगातून चिंता व्यक्त केली जात आहे आणि एमएसपी वाढवण्याची मागणी केली जात आहे. साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी एमएसपी वाढ होणे गरजेचे आहे.
---------------------
एमएसपी वाढल्या नंतर शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी मदत होणार असून त्याच बरोबर साखर कारखाने आर्थिक रित्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.
ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड
संचालक,श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
COMMENTS