सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
मूळ बीड जिल्ह्यातील असलेले विजय थीट्टे गाव सोडून मुलांच्या शिक्षणासाठी बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे आले. सुरुवातीला उदरनिर्वाह व मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षा चालवली. मुलाने पण बापाच्या कष्टाचं चीज करत शासनाच्या विविध चार परीक्षा उत्तीर्ण झाला. आज निखिल थिट्टे हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय फलटण येथे कार्यरत आहे.
यावेळी 'सोमेश्वर रिपोर्टर' शी बोलताना निखिल म्हणाला. बीड जिल्ह्यातून आमच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी बारामतीत सोमेश्वरनगर येथे स्थलांतर करण्याचा ८ वीमध्ये असताना निर्णय घेतला. सोमेश्वर मध्ये आल्यावर वडिलांनी उदरनिर्वाह करण्यासाठी निरा-सोमेश्वरनगर अशी रिक्षा चालवली. आमच्या शिक्षणासाठी मूळ गाव सोडून आल्याने येथे शिक्षण पूर्ण केले. वडिलांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट पहात होतो. आज विविध परीक्षेत निवड ही आई-वडिलांनी आमच्या शिक्षणासाठी घेतलेल्या निर्णयामुळे हे यशा पर्यत जाऊ शकलो.
वाघळवाडीतील येथील निखिल विजय थिट्टे यांनी नगरअभियंता (City Engineer)
नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन ,कनिष्ठ अभियंता ( JE ) बीड जिल्हा परिषद आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA)
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन या विविध पदाच्या झालेल्या परीक्षेत यश मिळवले असून तीन जागावर एकाच वेळी निवड झाली आहे. निखिल थिट्टे यांनी सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.
काही महिन्यापूर्वी झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (CEA) सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन या पदावर थिट्टे यांनी यश मिळविले होते. ते सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय फलटण येथे कार्यरत आहेत.
सात्यत ठेऊन अभ्यास करत होतो. सिव्हिल मध्ये पदवी घेतल्याने सिव्हिल मधील शासकीय पदाच्या करिता प्रयत्न करत होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या परीक्षा दिल्या, सुरुवातीला अपयशाची चव चाखावी लागली, अपयशातून शिकुन चुका सुधारून पुढे परीक्षा दिल्या त्यात यशस्वी ठरलो. ज्या पदावर जायचे ध्येय होते ते आता चार जागांच्या पदावर निवड झाल्याने ते स्वप्न पूर्ण झाले आहे. यश मिळे पर्यंत सयंम ठेवल्याने, घरचांची व मित्रांचा पाठींबा मिळाल्याने हे यश प्राप्त करू शकलो असे निखिल विजय थिट्टे यांनी सांगितले.
शासकीय परीक्षेत चार जागावर निवड झाल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.