Purandar News l भाषेची नाळ जुळली की देवाण-घेवाणची प्रक्रिया सोप्पी होते : महाराष्ट्र बँकेच्या ग्राहक मेळाव्यात खातेदारांची प्रतिक्रिया

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
निरा (ता. पुरंदर) येथे आज महाराष्ट्र बँकेच्या वतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये ग्राहकांनी बँकेच्या संदर्भातील आपल्या तक्रारी व अपेक्षा नीसंकोचपणे व्यक्त केल्या. त्याचबरोबर महाराष्ट्र बँकेच्या नीरा शाखेमध्ये खूप वर्षानंतर मराठी मध्ये लोकांशी संवाद साधणारे अधिकारी आणि कर्मचारी आल्याने खूप चांगले झाले असल्याचे समाधान नीरा येथील महाराष्ट्र बँकेच्या ग्राहकांनी व्यक्त केले आहे.
           सोमवारी सायंकाळी नीरा येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ज्येष्ठ नागरिक सभा गृहात  बँक ऑफ महाराष्ट्राचे नीरा शाखाधिकारी महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली   ग्राहक मेळावा पार पडला. यावेळी महाराष्ट्र बँकेच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्र बँकेच्यावतीने ग्राहकांच्या सोयीसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र बँकेचे नीरा शाखाधिकारी महेंद्र चव्हाण यांनी दिली  त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारी व त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. गृह कर्ज, व्यावसाय कर्ज, शासकीय योजनांसाठी दिले जाणारे कर्ज याबाबतची माहिती ग्राहकांना देण्यात आली. या संदर्भातील प्रश्न ग्राहकांनी विचारले. त्यांचे समाधानकारक उत्तरे त्यांना देण्यात आली. त्याचबरोबर यापुढे महाराष्ट्र बँकेच्यावतीने ग्राहकांना चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने ग्राहकांनी महाराष्ट्र बँकेला प्रथम पसंती द्यावी अस आवाहन चव्हाण यांनी केलं. यावेळी निरेतील अनेक प्रतिष्ठित व्यापारी यांच्यासह आपचे युवक अध्यक्ष महेश जेधे, आर पी आय चे स्वप्निल कांबळे, दादासाहेब गायकवाड, राष्ट्रवादीचे उमेश चव्हाण, महेश मदने यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 
To Top