पुणे-पंढरपूर रस्त्यावरील पाडेगाव टोल नाक्यावर भर रस्त्यात मोकाट गाढवांची दहशत : वाहनचालक त्रस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुणे - पंढरपूर  पालखी मार्गावरील पाडेगांव (ता.खंडाळा) येथील जुन्या टोलनाक्यांवर गेल्या
दहा - बारा दिवसांपासून परगावांहून आलेल्या
आठ - नऊ मोकाट गाढवांनी‌‌ भर रस्त्यात  सैरावैरा पळत  वाहतुकीला अडथळा आणत‌ आहेत. तसेच रस्त्याच्या मध्येच उभे राहून दहशत माजवित‌आहेत.
त्यामुळे दुचाकीस्वारांसह पाडेगांव टोलनाका परिसरातील नागरिक ञस्त‌ झाले आहेत. प्रसंगी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.

          पुणे - सातारा जिल्ह्याच्या सीमेवर पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील पाडेगांव ( ता.खंडाळा) येथील जुन्या  टोलनाका परिसरात समता आश्रम शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेण्यासाठी परिसरातील मुलांची दररोज ये - जा. सुरू असते. तसेच पाडेगांव फार्म कडे जाणा-या व येणा-या नागरिकांची मोठी रहदारी आहे. गेल्या दहा  दहा - बारा दिवसांपासून परगावांहून आलेल्या आठ - नऊ मोकाट गाढवं भर रस्त्यातून  सैरावैरा पळत  वाहतुकीला अडथळा आणत‌ आहेत. तसेच रस्त्याच्या मध्येच उभे राहून दहशत माजवित‌ आहेत. तसेच राञीच्या वेळेसही मोकाट गाढवं रस्त्यातून पळत असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना व पाडेगांव टोलनाका परिसरातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.यामुळे पाडेगांव टोलनाका परिसरातील नागरिक ञस्त‌ झाले आहेत. प्रसंगी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.तसेच एखादा अपघात घडला तर वाहनचालकाला मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे. 
  गेल्या पंदरा दिवसांपासून नीरा ( ता.पुरंदर) येथील पालखी तळाच्या मागील बाजूस परगावांहून‌ 
आलेला गाढव मालक गाढवांसह  वास्तव्यास असल्याचे समजते. गेल्या आठ दिवसांपासून गाढव मालक गाढवांकडे दुर्लक्ष करीत‌ आहे. 
दरम्यान, लोणंद पोलिसांनी गाढव मालकावर कारवाई करण्याची‌ मागणी ञस्त वाहन चालक यासह पाडेगांव  परिसरातील नागरिक करीत आहे.
--------------------------------------------------------------
To Top