सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
सातारा ते पुणे महामार्गावर सारोळे नजीकच्या देसाई कंपनी शेजारील विठू माऊली हॉटेलच्या समोर ट्रकने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल सर गंभीर जखमी झाला.शंकर बापूसो निकम वय -२४ गंभीर जखमी झाले असून जखमी तरुणास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील ट्रक केए २५ एबी ६०८४ प्लास्टिक दाना भरून मुंबईला जात असताना सातारा ते पुणे महामार्गावर सारोळे हद्दीत देसाई कंपनीच्या समोर ट्रकने याने मोटरसायकलला धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.राजगड पोलिसांनी शंकर माने या युवकाला सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवले.यावेळी सातारा -पुणे रोडवर लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. राजगड पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करून वाहतुकीस रस्ता खुला केला.
COMMENTS