सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
खंडाळा : विजय लकडे
खंडाळा तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील तरुण दिलीप आप्पा धायगुडे १९५० किमी सायकल प्रवास करत केदारनाथ ला पोहचला आहे.
दिलीप ने वाघोशी ते केदारनाथ १९५० किमी प्रवास १० मे रोजी सुरू केला आणि तो ५ जुन रोजी केदारनाथ येथे पोहचला या प्रवासाला २७ दिवस लागले असुन हा प्रवास त्याने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश,व उत्तराखंड या ५ राज्यांमधुन केला ऊन वारा पाऊस यात त्याने सायकल प्रवास करत समाजाला सायकल प्रवास करण्याचा संदेश दिला आहे तसेच प्रवासावेळी झाडांचे महत्त्व त्याच्या लक्षात आल्याने झाडे लावा व ती जगवा असा संदेश देखील त्याने दिला आहे
दिलीप सध्या केदारनाथ येथेच आहे दोन दिवसांत तो गावी परतणार असुन संपूर्ण महाराष्ट्रातुन दिलीपवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.या सायकल प्रवासामुळे दिलीपने आई वडील त्याच्या गावाबरोबर तालुका व जिल्हाचे नाव उज्ज्वल केले आहे. या प्रवासासाठी इंडियन ग्रुप ऑफ वाघोशी यांनी दिलीपला पाठबळ दिले होते. दिलीपच्या आगमणाची ग्रामस्थ आतुरतेने वाट पाहत आहे त्यांच्या स्वागतासाठी तरूण वर्ग सज्ज झाला आहे.