Baramati News l कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा सिंहाचा वाटा : पुरुषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कारखान्यातील कामगार हा कारखान्याचा महत्वाचा घटक असतो. कामगारांनी प्रामाणिक व चांगल्या प्रकारे सेवा बजावत कारखान्याच्या प्रगतीला हातभार लावला. आज राज्यात सोमेश्वर कारखान्याचा राज्यात नावलौकिक आहे. यामध्ये कामगारांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. 
            सोमेश्वर कारखान्यातील आज २३ कामगारांचा सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त कारखान्याच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्ष बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब कामठे, माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे,संचालक शिवाजीराजे निंबाळकर, सुनील भगत, संग्राम सोरटे, लक्ष्मण गोफणे, तुषार माहूरकर,अनंत तांबे, आनंदकुमार होळकर, ऋषि गायकवाड, प्रणिता खोमणे, प्रवीण कांबळे, विश्वास जगताप, हरिभाऊ भोंडवे, किसन तांबे, शांताराम कापरे, कमल पवार, सचिव कालिदास निकम, शेतकी अधिकारी सतीश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राजवर्धन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
            रमेश शिंदे, सतीश जगताप, हनुमंत गडदरे दत्ता माळशिकारे, नंदकुमार भोसले, लहूशिंग गायकवाड, ज्ञानदेव गाढवे, पोपट दिवेकर, शिवाजी वायाळ, संजय फरांदे, प्रल्हाद नेवसे, बाळासाहेब कदम, प्रकाश सावंत, विजय काकडे, बाळासाहेब वायसे, मोहन लावंड, गोकुळ ठोकळे, नारायण धुमाळ, धनंजय भगत, शिवदत्त नवले, राजेंद्र होळकर, हेमंत ढोले, सूर्यकांत शिंदे या कामगारांचा सेवपूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. 
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कामगार अधिकारी दीपक निंबाळकर यांनी मानले.
To Top