Baramati News l निंबुत-फरांदेनगर येथे दिवसाढवळ्या घरे फोडली : रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने लंपास

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निंबुत-फरांदेनगर ता. बारामती येथे एक घर फोडले तर एका घराचा कडी-कोयंडा तोडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रोख रक्कम व दागिने असा मिळून ५५ हजाराचा ऐवज लंपास केला. 
            आज दुपारी साडेअकरा ते दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये कांतीलाल फरांदे यांच्या घरातील रोख रक्कम व दागिने गेले असून
समता पतसंस्थेचे सचिव युवराज फरांदे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. 
           घटनास्थळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.
To Top