लोणावळा l श्रावणी कामत l शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या पान टपरी धारकांवर कारवाईचा बडगा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणावळा : श्रावणी कामत 
सत्यसाई कार्तिक सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा
विभाग लोणावळा यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये
असणा-या पान टपरी - यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला विक्री होत
असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सत्यसाई कार्तिक सहा पोलीस अधीक्षक तथा
उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी व त्यांचेकडील पोलीस स्टाफ तसेच
लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफसह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर
छापा टाकला. 
      असता रवि शंकर बुगडे व .व.२४ रा. गवळीवाडा, लोणावळा ता.मावळ जि.पुणे (दिलखुश पान शॉप गवळीवाडा) अतुल बळीराम लोखंडे व व.४२ रा.गवळीवाडा, किरण पेट्रोलपंपाशेजारी, तुंगार्ली, लोणावळा ता. मावळ जि. पुणे ( रुद्रांश पान शॉप) कृष्णा संदीप गवळी व.व.१९ रा. गवळीवाडा, लोणावळा ता. मावळ जि. पुणे ( कृष्णा पान शॉप) शोयब नईम
खान व.व.२५ रा.११२, म्हाडा कॉलनी लोणावळा ता. मावळ जि.पुणे (श्रीराम पान शॉप)
मनोजकुमार महावीर प्रसाद भारव्दाज वय ३० वर्षे रा. श्रीकृपा अपार्टमेंट प्लॉट नं. २८ नांगरगाव
लोणावळा ता. मावळ जि.पुणे (कुणाल पान शॉप) उमर मोहमद एम. बी. वय ४८ रा. मराठी
शाळेजवळ गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे (इन्टरवल पान शॉप) मोहम्मद एकलास
खान व.व.३४ रा.१०२, जी - वार्ड, लोणावळा ता. मावळ जि. पुणे (केजीएन पान शॉप)  संजय कान्हु
सोनवणे वय ६० वर्षे रा. अदितय सोसायटी फ्लॅट नं. ५३ भांगरवाडी लोणावळा ता. मावळ जि.पुणे
(संजय पान शॉप)  अशोक गुंडू पुजारी वय ५६ वर्षे रा. व्दारकामाई सोसायटी फ्लॅट नं. ए १
लोणावळा ता.मावळ जि. पुणे (गणेश पान शॉप)  शकील अख्तर रईससुद्दीन शेख वय १९ वर्षे
रा. रुम नं. १५ हुडको कॉलनी लोणावळा ता. मावळ जि.पुणे (एकविरा पान शॉप) मोहम्मद
हसिब शरीफ मन्सुरी वय ३८ रा. विष्णु अजगेकर यांचे घरी भाडयाने, इंदीरानगर लोणावळा ता.
मावळ जि.पुणे (श्री स्वामी समर्थ पान शॉप) यासीन मोहम्मद अब्दुल रेहमान वय २७ वर्षे रा.
राममंदिर शेजारी गवळीवाडा लोणावळा ता. मावळ जि.पुणे (बिग ५ पान शॉप)  अब्दुल रहिमान
इब्राहिम वय ३५ रा. पिंगळे यांचे भाडयाचे घरात वलवण लोणावळा ता. मावळ जि.पुणे (रॉयल पान
शॉप) वसुद्दीन सिराजउद्दीन खान वय ३६ वर्षे रा. सनाभाभी यांचे खोलीमध्ये भाडयाने
नेताजीवाडी खंडाळा ता. मावळ जि.पुणे (वसीम पान शॉप) यांचे कब्जात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत
केलेला वेगवेगळया कंपन्यांचा सुगंधीत तंबाखुजन्य गुटखा, पानमसाला असा एकुण १,०८,७७२/-
रुपयाचा मुदेदमाल मिळुन आल्याने तो गुन्हयाचेकामी जप्त करणेत आला असुन वरील इसमांना
ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई  पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे, ग्रामीण व अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली सत्यसाई कार्तिक सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांनी व
त्यांचेकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीसांनी केली आहे.
To Top