सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील कोदवडी फाटा ते चिरमोडी निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम येथील स्थानिक नागरिकांनी थांबवले.
कोदवडी फाटा ते चिरमोडी पाच किलोमीटर रस्ता करणे. रस्त्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी मंजूर
सन 2021 22 सालामध्ये रस्त्यास मंजुरी मिळाली.
कोदवडी फाटा ते चिरमोडी या रस्त्याचे काम मागिल वर्षी सुरू झाली होते, परंतु ठेकेदाराने हे काम अर्धवटच बंद केली होते यावर्षी या रस्त्याच्या कामाची मुदत संपली ठेकेदाराने पुन्हा मुदतवाढ घेतली परंतु संभाजी ठेकेदाराने ताबडतोब काम सुरू करणे अपेक्षित होते,परंतु संपूर्ण उन्हाळा गेला आणि ठेकेदाराला मुहूर्त सापडला नाही, ठेकेदाराला मुहूर्त सापडला तो एक जून चा मान्सून पूर्व पावसाळा सुरू असून परिसरात मोठ्या प्रमाणे पाऊस पडत आहे तरी देखील संभाजी ठेकेदाराने हे काम सुरू केले आहे, पावसाचे पाणी रस्त्यावर ठिकठिकाणी साचली असून देखील संबंधित ठेकेदार याच साचलेल्या पाण्यावर काम करत आहे, साचलेल्या पाण्यावर रस्ता केल्यास हा रस्ता दर्जाहीन होत असतो हे संबंधित ठेकेदाराला माहीत असून देखील त्याने जाणून-बुजून हे काम सुरू ठेवले होते, येथील किल्ले राजगड पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावचे सरपंच गुलाब रसाळ, लव्ही गावचे सरपंच शंकर रेणुसे, चिरमोडी गावचे माजी सरपंच किसन रसाळ, मार्गासनी विकास सोसायटीचे चेअरमन नथु वालगुडे, विकास सोसायटीचे संचालक तानाजी फणसे, मार्गसनी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंढरीनाथ पानसरे यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले.
या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले संबंधित ठेकेदाराला काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या निकृष्ट दर्जाचे काम झाले असेल तर कामाचे बिल अदा करण्यात येणार नाही
याबाबत गुंजवणे गावचे सरपंच गुलाब रसाळ म्हणाले की किल्ले राजगड या ठिकाणी असंख्य पर्यटक दररोज येत असतात परंतु रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे पर्यटकांवर याचा परिणाम होत आहे पर्यटकांची संख्या रस्त्यामुळे कमी झाली आहे.