सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बालगंधर्व परिवार रंगमंदिर 56 वा वर्धापन दिन सोहळा 2024 संपन्न झाला. यावेळी पुणे जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट बालगंधर्व पुरस्काराने अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते वडगाव निंबाळकर येथील जादूगार शिवम महेंद्र सदाशिव माने व निंबुत येथील जितेंद्र काकडे यांना प्रधान करण्यात आला.
सुप्रिया हेंद्रे (अधीक्षक सांस्कृतिक केंद्र पुणे महापालिका) योगेश देशमुख (बालगंधर्व परिवाराचे सदस्य ) महाराष्ट्र राज्य जादूगार संघटनेचे अध्यक्ष विनायक कडवळे यांनी योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यात मदत केली. जितेंद्र काकडे यांना बालगंधर्व पुरस्कार विशेष पुरस्काराने तर जादूगार शिवम यांनी गेले 27 वर्षे झाले आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अंधश्रद्धा , व्यसनमुक्ती,एड्स, ग्रामस्वच्छता अभियान,वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या, स्वाईन फ्लू,कोरोना अशा महाभयंकर रोगावर कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतात.तरुण पिढीला जादू विज्ञान चमत्कार याविषयी माहिती देऊन श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातला फरक पटवून देतात.जादू कलेच्या माध्यमातून अनाथ मुलांना आश्रम शाळा, मंदिर ट्रस्ट, अपग्रस्त,आदिवासी ग्रस्त मुलांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत असतात. यावेळी जादूगार शिवम यांनी स्टेजवर काही जादूचे प्रयोग दाखवून प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकाचा वर्षाव मिळाला. जीवनात काय कमावलं असेल तर हेच कमावले आहे ते म्हणजे प्रेक्षकांचे प्रेम आपुलकी आदर मान सन्मान असे जादूगार शिवम महेंद्र सदाशिव माने यांनी सांगितले.