सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
ग्रामीण भागासह शहरातील पालकांनी शिक्षणाला महत्त्व देऊन मुला-मुलींना समानतेची वागणूक देत प्राधान्याने मुलांना उच्चशिक्षित करावे. सध्याचे विद्यार्थी भविष्यकाळातील देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक तसेच शिक्षकांनी पुढे येऊन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवावेत भविष्यातील आदर्श देश घडेल असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.
ध्रुव प्रतिष्ठान टीटेघर ता.भोर आयोजित अनाथ, गरीब, गरजू विद्यार्थी शैक्षणिक साहित्य ,प्रशिक्षण प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमप्रसंगी टीटेघर येथील कै.अण्णासाहेब पाटील सभागृहात संभाजीनगर येथील आदर्श सरपंच व ग्रामविकास तज्ञ भास्करराव पेरे पाटील बुधवार दि.२६ बोलत होते.यावेळी टेक्नो फोर इलेक्ट्रॉनिकचे नितीन वकरे,बालाजी मडके, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, ध्रुव प्रतिष्ठान अध्यक्ष राजीव केळकर,शाहीर रंगराव पाटील,सरपंच शशिकला नारायण नवघणे, उपसरपंच शंकर तुकाराम सणस, केंद्रप्रमुख अंजना वाडकर ,समीर घोडेकर, पंडित गोळे, विठ्ठल दानवले, माऊली बदक आदींसह आंबवडे खोऱ्यातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
पेरे पाटील पुढे म्हणाले गावोगावची शाळा मंदिर समजून विद्येच्या मंदिरात पालकांनी मुले उच्चशिक्षित होण्यासाठी व एकही मुलगा- मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी कसोशीने प्रयत्न मुले शाळेत पाठवावीत तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कार्यकाळात अभ्यासाबरोबरच कला गुणांना वाव द्यावा.
COMMENTS