सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरती ट्रक आणि बोलेरो गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये बोलेरो गाडीतील चालक जागीच ठार झाला.
कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या ट्रक क्र .MH 12 QW 7899 ट्रकची जेजुरी एमआयडीसी मधून मांडकी येथे निघालेला बोलेरो गाडी क्रमांक MH 12 VT 8265 या गाडीचा वाल्हे नजीक पात्रमळा येथे समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये बोलेरो गाडीचा चालक नवनाथ बाजीराव वाघमारे वय 42 रा. मांडकी ता. पुरंदर हा चालक जागीच ठार झाला. अपघात एवढा भीषण होता की बोलेरो गाडीचा अर्धा भाग कापत गेला यामध्ये ट्रक चालकाचा डोक्याला मार लागला या धडकेत बोलेरो चालक जागीच ठार झाला.